सीएसआर

महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनमध्ये आम्हाला सामाजिक दृष्टीकोनातून देशाचा विकास करण्यासाठी मदत करण्याची गरज आहे हे समजते. आमच्या संस्थेमध्ये कॉर्पोरेट व सामाजिक जबाबदाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत म्हणूनच आम्ही आमच्या शहराला राहण्यासाठी एक चांगले ठिकाण बनविण्यास मदत करणाऱ्या सामाजिक उपक्रमांमध्ये गुंतलो आहोत. महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सरकारच्या (केंद्र आणि राज्य दोन्ही) प्रयत्नांना साथ देतो.

सामाजिक कार्यामध्ये संस्थेचे असलेले योगदान :
  • सन २०२० मध्ये, जेव्हा कोरोनामुळे आपले कामगार बंधु आथिर्क अडचणींमध्ये होते तेव्हा सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन तर्फे मोफत अन्नधान्यांचे वाटप करण्यात आले.
  • सन २०२१ मध्ये, जेव्हा संपूर्ण चिपळूण पुराच्या पाण्याने वेढले होते व भरमसाठ नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान झाले होते तेव्हा आपल्याला असोसिएशन तर्फे चिपळूण येथील बांधवांना रु.५,५२,००० (पाच लाख बावन्न हजार रुपये) ची मदतनिधी आणि मोफत अन्नधान्यांचा व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पाठपुरवठा करण्यात आला.
  • कोरोना महामारीच्या वेळेस नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात तात्काळ कोविड खाटांची क्षमता वाढविण्यासाठी आथिर्क मदत करण्यात आली.
  • विविध उद्याने, मार्ग, रस्ते दुभाजक इत्यादींचे सुशोभीकरण हाती घेऊन नवी मुंबईच्या “झाडे लावा,झाडे जगवा” या मोहिमेला सदस्यांनी समर्थपणे पाठिंबा दिला.
  • महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनने मलेरियाविरोधी मच्छरदाणी बांधकाम कामगारांना दान केली आहे आणि त्यांच्या सदस्यांना बांधकाम जागा स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
  • रायगड जिल्ह्यात तसेच पनवेल तालुक्यात नैसर्गिक समतोल राखण्यासाठी महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन तर्फे दोन हजार झाडे लावण्यात आली तसेच भविष्यात आणखी झाडे लावण्याचा मानस आहे.
  • महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनने महाराष्ट्रातील मराठी बांधकाम उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी व्यवसायिक शिबिर आयोजित केले आहेत.