आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

शासनाने लागू केलेल्या एकत्रित विकास व प्रोत्साहन नियमावलीच्या माध्यमातून सदस्यांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून शासन स्तरावरून त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे. नवी मुंबईचे बाजूलाच विकसित होत असलेल्या “नैना” या प्रकल्पातील विकास योजना खासकरून २३ गाव योजने अंतर्गत येणाऱ्या नगर परियोजना लवकरात लवकर कार्यान्वीत करणे किंबहुना शासन स्तरावर व्यावसायिकांना अपेक्षित असे बदल करणे करिता प्रयत्न करणे. मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवेच्या बाजूलाच, MSRDC हे नवीन क्षेत्र निर्माण झालेले असून‌ त्याबाबतीत सदस्यांना अवगत करून नियमावलीमध्ये अपेक्षित बदल घडवून आणणे.
व्यवसाय करत असताना येणारे शासकीय कर / वस्तू व सेवा कर व‌ इतर करासंबंधी सदस्यांना वेळोवेळी माहिती मिळावी याकरिता वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्नशील राहणे. व्यवसायातील अडीअडचणींवर मात करणेसाठी व प्राप्त परिस्थितीमध्ये बांधकाम व्यवसायातील आव्हाने समजून घेवून बांधकामातील गुणवत्ता व खर्च बचत करण्यासाठी प्रयत्न करणे. नवनिर्वाचित पनवेल महापालिका क्षेत्रातील विकास नियंत्रण नियमावली समजून घेवून सदस्यांना अवगत करणे.
सिडकोकडून देण्यात येणाऱ्या १२.५% व २२.५% योजने अंतर्गत वाटप झालेल्या भूखंडाकरिता बांधकाम परवानगी व भोगवाटा प्रमाणपत्र या संदर्भात येणाऱ्या अडचणी समजून घेवून त्याकरिता प्रयत्न करणे. संस्थेच्या सदस्यांना व्यवसाय करताना आणि आचारसंहिता लागू करुन नैतिक मूल्यांचे जतन करणे. संघटनेतील सदस्यांना वेगवेगळ्या विषयांवर सेमिनार आयोजित करून सदस्यांना आथिर्कदृष्ट्या मजबूत करणे व सदस्य संख्या वाढविण्यावर लक्ष ठेवणे.

शासनाने लागू केलेल्या एकत्रित विकास व प्रोत्साहन नियमावलीच्या माध्यमातून सदस्यांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून शासन स्तरावरून त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे.

नवी मुंबईचे बाजूलाच विकसित होत असलेल्या “नैना” या प्रकल्पातील विकास योजना खासकरून २३ गाव योजने अंतर्गत येणाऱ्या नगर परियोजना लवकरात लवकर कार्यान्वीत करणे किंबहुना शासन स्तरावर व्यावसायिकांना अपेक्षित असे बदल करणे करिता प्रयत्न करणे.

मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवेच्या बाजूलाच, MSRDC हे नवीन क्षेत्र निर्माण झालेले असून‌ त्याबाबतीत सदस्यांना अवगत करून नियमावलीमध्ये अपेक्षित बदल घडवून आणणे.

व्यवसाय करत असताना येणारे शासकीय कर / वस्तू व सेवा कर व‌ इतर करासंबंधी सदस्यांना वेळोवेळी माहिती मिळावी याकरिता वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्नशील राहणे.

व्यवसायातील अडीअडचणींवर मात करणेसाठी व प्राप्त परिस्थितीमध्ये बांधकाम व्यवसायातील आव्हाने समजून घेवून बांधकामातील गुणवत्ता व खर्च बचत करण्यासाठी प्रयत्न करणे.

नवनिर्वाचित पनवेल महापालिका क्षेत्रातील विकास नियंत्रण नियमावली समजून घेवून सदस्यांना अवगत करणे.

सिडकोकडून देण्यात येणाऱ्या १२.५% व २२.५% योजने अंतर्गत वाटप झालेल्या भूखंडाकरिता बांधकाम परवानगी व भोगवाटा प्रमाणपत्र या संदर्भात येणाऱ्या अडचणी समजून घेवून त्याकरिता प्रयत्न करणे.

संस्थेच्या सदस्यांना व्यवसाय करताना आणि आचारसंहिता लागू करुन नैतिक मूल्यांचे जतन करणे.

संघटनेतील सदस्यांना वेगवेगळ्या विषयांवर सेमिनार आयोजित करून सदस्यांना आथिर्कदृष्ट्या मजबूत करणे व सदस्य संख्या वाढविण्यावर लक्ष ठेवणे.

आमची उद्दिष्टे


  • एकता आणि सहकार्याची भावना वाढवणे आणि परस्पर सुविधा देणे आणि सदस्यांमधील अस्वास्थ्यकर स्पर्धा आणि अनुचित व्यापार पद्धती दूर करणे.
  • व्यापार पद्धती व बांधकाम व्यवसाया संबंधित इतर व्यापार आणि उद्योगांचे संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणे.
  • राज्यात, देशांतर्गत व जागतिक स्तरावर MHBA ची प्रतिमा व दृश्यमानता वाढविणे
  • बांधकाम उद्योगाविषयीच्या समस्यांबाबत आणि स्थानिक संस्था, अधिकारी आणि केंद्र सरकार यांच्याशी विविध धोरणात्मक समस्या मांडणे व त्याचे निराकरण करण्याकरिता योग्य त्या सूचना करणे.
  • देशांतर्गत बांधकाम व्यावसायिक संघटनांचे सदस्यत्व घेवून व्यावसायातील अडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे.
  • गृहनिर्माण उद्योगाच्या हितसंबंधांना चालना देणाऱ्या अशा कायद्यांचे समर्थन किंवा विरोध करण्यासाठी गृहनिर्माण उद्योगाशी संबंधित हितसंबंधांचे मानक व्यासपीठ विकसित करणे आणि रचनात्मक कृती करणे.
  • नवी मुंबई ठाणे येथील विकासकांना (बिल्डर्स) एकत्रीत आणुन त्यांची एकजुटीची संघटना निर्माण करणे तसेच या व्यवसायाशी सलग्न असलेल्या इतर मराठी व्यवसायीक व्यक्तिंना एकत्रीत आणुन त्यांची सलग्न संघटना निर्माण करणणे. (उदा. वास्तु विशारद बांधकाम, अभियंता, बांधकाम ठेकेदार, बांधकाम सामान पुरवठा ठेकेदार)
  • संघटनेच्या सदस्यांना आर्थिक व अन्य बाबतीत कशाप्रकारे मदत होऊ शकेल व त्यांच्यात असलेल्या संघटनेविषयी असलेला विश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
  • संघटनेतील सदस्यांना एकत्र येऊन व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर चर्चासत्र ठेवून मोठे-मोठे प्रकल्प साकारण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • सभासदांना असलेले प्रकल्प संघटनेच्या मार्फत पुर्णत्वास नेणे.
  • सभासदांना अडी-अडचणिला कायद्याचे मार्गदर्शन देणे व मदत करणे.
  • महाराष्ट्रीयन उद्योजकांना, व्यवसायीकांना चालना देणे करिता सामाजीक प्रयत्न करणे.
  • महाराष्ट्रीयन सदनिका खरेदीदारांचा विश्वास प्राप्त करून त्याच्या बजेटमध्ये घरे उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या होणाऱ्या अन्यायाची सामुहिक जवाबदारी म्हणुन त्यांच्यावरील अन्याय दुर करण्याचा प्रयत्न करणे.
  • सर्व सामान्य महाराष्ट्रीय खरेदीदारांसाठी वेबसाइट तयार करून जगातील सदनिकेची नोंदणी करून व त्यांची निकड भागवणे.
  • शासन दरबारी महाराष्ट्रीयन उद्योजकांना तसेच व्यवसायीकांना प्रोत्साहन मिळणे करीता विशेष आर्थिक पुरवठा, कमी दरात कर्ज पुरवठा यांची मागणी करणे.
  • शासनाकडुन सर्वसामान्य किंवा गरिब कुटुंबांना घरे बांधुन देण्याकरिता विशेष योजना तयार करून त्या करिता विशेष सवलती उदा. इनकमटॅक्स फ्री प्रोजक्ट तयार करणे. प्रोजेक्ट ची मागणी करणे या करिता सिडको कडे भुखंडाचे रिजव्हेंवेशन करणे व सदर कामे महाराष्ट्रीयन व्यवसायीकांना देणेकरिता प्रयत्न करणे.
  • महाराष्ट्रीयन असोसिएशनच्या सर्व विकासकांना ठरविल्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट स्वरूपातील विविध कामे महाराष्ट्रियन तरूणांना देणे करिता प्रयत्न करणे व प्रोत्साहन देणे.
  • सिडको स्थरावरील 12.5% योजने अंर्तगत व भुखंड वाटपाच्या प्रक्रियेमधील उद्योजक व व्यवसायीक तरूणांना काम करण्याची संधी प्राप्त करणे, तसेच वाटप प्रक्रियेत सुत्र बध्दता आणणे करिता प्रयत्न करणे.
  • महाराष्ट्रीयन बांधवांशी मानसीकतेत बदल करून त्यांना व्यवसायभिमुख करणे व त्यांच्या आर्थिक महत्वाकांक्षा निर्माण करणे.
  • व्यवसायीक संधीची ओळख व जाणिव करून देणे.
  • महाराष्ट्रियन बंधवात संपर्क साधुन अर्थवृध्दिचा विचार करणे,
  • स्वतःच्या व्यवसाय वृध्दि बरोबरच दुसऱ्यांच्या व्यवसायवृध्दि विषयी जागृत असणे.
  • परस्परातील नेटवर्किंग घडवुन आणणे व त्यांचा एकमेकांना फायदा करून देणे.
  • बिल्डर ग्राहक यांच्यात परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करणे.
  • सामाजिक निधी उभी करणे आणि सामाजिक बांधीलकी करिता आर्थिक मदत करणे.